इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ आता ट्वेंटी20 मालिकेसाठी सज्ज आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी20 मालिकेसाठी आज संघ जाहीर करण्यात आला. या संघाचे नेतृत्त्व सांगली कुपवाड येथील नवकृष्णा व्हॅली स्कुल ची विद्यार्थिनी व भारतीय महिला संघाची अग्रेसर खेळाडू सलामीवीर स्मृती मानधना करणार आहे.हा समस्त सांगलीकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. स्मृतीला कर्णधार म्हणून खूप खूप यश मिळो आणि भारताचा लौकिक क्रिकेटच्या विश्वात द्विगुणित होवो हीच शुभेच्छा ।
 

Comodo SSL