मातोश्रीं कै.बबीबाई सुरजमल लुंकड

मातोश्रीं कै.बबीबाई सुरजमल लुंकड

सुरज फौंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या महिलांना पुरस्कार देणेबाबत .......

सुरज फौंडेशन हि संस्था सन २००१ सालापासून शैक्षणिक, क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रामध्ये विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेत आहे. या संस्थेच्या मराठी माध्यम,इंग्रजीमाध्यम,गुरुकुल,संगणक विभाग,क्रीडा विभाग,इत्यादी शाखा सांगली, म्हैशाळ, उत्तूर, पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविणारी सुरज फौंडेशन पश्चिंम महाराष्ट्रातील एकमेव अग्रगण्य अशी संस्था आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध क्षेत्रात सामाजिक व शैक्षणिक काम करणा-या आणि प्रसिद्धीपासून लांब राहून सदैव कार्यरत राहणा-यां महिलांचा शोध घेऊन मा.प्रवीणशेठ लुंकड यांच्या मातोश्रीं कै.बबीबाई सुरजमल लुंकड यांच्या दि.०७ जानेवारी २०१८ रोजी असणा-या पुण्यतिथीनिमित्त पुढील वर्षापासून शिक्षणभूषण व समाजभूषण अशा दोन महिलांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा सुरज फौंडेशन संस्थेचा मानस आहे. तरी अशा महिलांनी आपले प्रस्ताव दिनांक ३१ डिसें.१८ पर्यंत सुरज फौन्डेशन पी-६१ एम.आय.डी.सी.कुपवाड जि.सांगली पिन ४१६४३६ या पत्यावर पाठवावेत. असे आवाहन संस्थेचे सचिव एन.जी.कामत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क साधा ७७६८००३८१० / ०२३३६६३६६३१


Comodo SSL