संकल्पना

संकल्पनाभारत हा विकसनशील देश आहे हे आपण जाणतोच. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणाले होते, ” तरुणाई ही भारताची ताकद आहे.” अभ्यासात्मक सर्वेक्षण केल्यानंतर असे निदर्शनात येत आहे की तरुणाईमधील कितीतरी युवती पारंपारिक शिक्षणापासून वंचित आहेत. आर्थिक परिस्थिती किंवा शिक्षणातील असुविधा यामुळे शिक्षणात अडचणी येतात, ही परिस्थिती लक्षात घेता सुरज फौंडेशन संस्थेला असं वाटतं की या युवतींना जीवन कौशल्यावर आधारित शिक्षण दिल्यामुळे त्या स्वबळावर कोणतेही काम करण्यात सक्षम होतील.

विभक्त कुटुंब पद्धती आणि परदेशात कलान तर होण्याचा कल, यामुळे कुटुंबाच्या गरजा बदलत आहेत. आर्थिक स्थैर्याने कुटुंबाला आधार मिळतो ही काळाची गरज आहे, पण कौटुंबिक स्वास्थ्य जपण्यासाठी मनुष्यबळाच्या आधाराची गरज कुटुंबीयांना असते. या गरजांचा विचार करून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी सुरज फाउंडेशन या संस्थेने “ सहेली” या प्रकल्पाची निर्मिती केली. या अंतर्गत ज्या युवतींना काही कारणाने पुरेसे शालेय शिक्षण घेता आले नाही मात्र त्यांच्यात अनेक कौशल्य दडलेली आहेत, काहीतरी करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे, अशा सोळा वर्षाहून अधिक वयोगटाच्या विद्यार्थिनींना जीवन कौशल्य यावर आधारित प्रशिक्षण देण्याचे ठरवले.

कुटुंबात मिसळून सेवा देणाऱ्या विश्वासू, प्रामाणिक कुटुंब मैत्रिणींची गरज वाढली आहे. अशी चांगली प्रशिक्षित कुटुंब मैत्रीण तयार करणे व तिच्या कामाला व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून देणे हा सहेली प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

कुटुंब मैत्रीण बनून, कुटुंबाची सेवा करणे हे एक वेगळे कौशल्य असते असे सुरज फाऊंडेशनला जाणवते, म्हणूनच खालील नमूद केलेले विषय “ सहेली “ जीवन कौशल्य प्रशिक्षणात अंतर्भूत केलेले आहे.

प्रकल्पात या कामातील कौशल्य जसे की : पाहुणचार,घर सजावट, बागकाम वाहन चालवणे(दुचाकी, चार चाकी), स्वयंपाक इ. प्रशिक्षण युवतींना मिळेल. तसेच व्यक्तींच्या बाल्यावस्था – प्रौढावस्था मध्ये मदतनिसाची गरज मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळे बालकांना- वृद्धांना सांभाळण्याचे कौशल्य या प्रशिक्षणात मिळेल.

सामान्यपणे व्यक्ती म्हणून अगदी मूलभूत गरज ओळखली ती सुरज फाउंडेशनने. लहान बाळ असो किंवा वयोवृद्ध कधी ना कधी अशा व्यक्ती कुठेतरी धडपडतात, पडतात तेव्हा त्यांना खरचटतं, लागतं अशावेळी ड्रेसिंग ची गरज पडते. माणूस म्हटले की आजारपण हे आलंच त्यासाठी असे छोटे छोटे आजार कसे हाताळायचे प्रथमोपचार काय असावेत याचे प्रशिक्षण सहेली मध्ये ते मिळेल.

सहेली जीवन कौशल्य प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या युवतींना सक्षमीकरणासाठी कौशल्य आणि सरावासह प्रशिक्षित केले जाते. या प्रशिक्षणानंतर कुशल आणि सक्षम युवती स्वावलंबी बनतील. त्यांना रोजगार उपलब्ध होईल शिवाय प्रशिक्षित कुटुंब मैत्रीण सेविका असल्यामुळे तिच्या कामाला प्रतिष्ठा आणि समाजात सन्मान प्राप्त होईल हे विशेष.


कार्यपद्धती व निवड प्रक्रिया

कार्यपद्धती व निवड प्रक्रिया
  • "सहेली" ची सुरुवात कुपवाड, जिल्हा सांगली येथे करण्यात येणार आहे.
  • निवासी स्वरूपाच्या या प्रकल्पासाठी निवड झालेल्या तरुणींचे सक्षमीकरण कौशल्यविषयक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
  • प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असेल. त्यामध्ये दोन महिने कालावधीचा प्रात्यक्षिक सरावाचा समावेश असेल.
  • प्रशिक्षण अल्प कालावधीचे असल्यामुळे या कालावधीत रजा मिळणार नाहीत.
  • प्रशिक्षण काळात निवास-भोजनाची व्यवस्था करण्यात येईल.
  • प्रशिक्षणादरम्यान युवतींना संबंधित विषयातील अनुभवी व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.

प्रशिक्षणाची सुरुवात व तपशील

प्रशिक्षणाची सुरुवात व तपशील
  • प्रशिक्षणाची सुरुवात दरवर्षी जानेवारी आणि जुलै मध्ये होईल.
  • सराव प्रात्यक्षिक सह प्रशिक्षण जून तसेच डिसेंबर मध्ये संपेल.
  • यादरम्यान प्रशिक्षणासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.
  • मार्गदर्शन सत्राद्वारे प्रशिक्षणार्थींना संबंधित स्वयंसेवी संस्था व अनेक लोकांशी विचार.
  • विनिमय करून चर्चेच्या संधी उपलब्ध होतील.

प्रशिक्षणाचे फायदे व संधी

प्रशिक्षणाचे फायदे व संधीप्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांच्या प्रशिक्षण क्षेत्रात प्रशिक्षित सेविका , गृह उद्योग , उद्योजक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल.

सहेली द्वारा संबंधित युवतींना त्यांच्या अपुऱ्या व मर्यादित शिक्षणाच्या जोडीला संबंधित विषयावर आधारित कौशल्य तंत्रज्ञानाचा लाभ होऊ शकतो प्रसंगी संगणकीय कार्यपद्धतीचा सराव करता येऊ शकतो. घरकाम , नरसिंग यासारख्या प्रशिक्षणामध्ये घरगुती गरजेपुरत्या वैज्ञानिक साधनांचा उपयोग करून प्रशिक्षित युवती आजूबाजूच्या गरजूंना चांगली सेवा पुरवू शकतात त्यामुळे त्यांचा त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या तरुणी जिथे जातील त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. रोजगाराच्या संधीसाठी या युवतींना शहराच्या ठिकाणे स्थलांतर करावे लागणार नाही. त्यांच्या या परिसरामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. परिसरातील गरजूंना याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. प्रशिक्षणानंतर यशस्वी युवतींना त्यांच्या स्वतःच्या कार्य कौशल्यावर आधारित रोजगार स्वयंरोजगार द्वारा दरमहा समाधान कारक आर्थिक प्राप्ती अपेक्षित असल्याने अशा युवतींना उज्वल भविष्य सहेलीच्या माध्यमातून लाभणार असल्याचे आशादायी चित्र आहे.


प्रशिक्षणाचे टप्पे

अभ्यासक्रम १

diagram 1

अभ्यासक्रम २

diagram 2

अभ्यासक्रम ३

diagram 3

संपर्क

Suraj Foundation

P-61, Krishna Valley Complex, MIDC, Kupwad, Dist: Sangli, Miraj, Maharashtra 416436

0233-6636666 /+91 7887893838

saheli@surajfoundation.org.in